जनतेज न्युज

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना लिहले रक्ताने पत्र

प्रतिनिधी, औरंगाबाद : मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्या यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 43 रक्ताची निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य सहन रमेश केरे पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत त्यावेळी ही निवेदने देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सरकार ओबीसी आरक्षणाबाबत जी भूमिका घेते तीच भूमिका मराठा आरक्षणासाठी का घेत नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहेत.