जनतेज न्युज

सांगली जिल्ह्यातील कुडनूर शाळेमध्ये हॅन्ड ग्रँड बॉम्ब सापडला

प्रतिनिधी, सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कुडनूर या गावी मराठी मुलांच्या शाळेमध्ये हॅन्ड ग्रँड बॉम्ब सापडला आहे.. शाळेची मुलं बॉल खेळत असताना खिडकीतून आत गेल्याने ते चेंडू आणण्यासाठी खोलीत गेले होते त्यांना ते नजरेस पडल्यानंतर गावातील नागरिकांना सांगितले. ही माहिती उपसरपंच गुलाब पांढरे यांना कळाले त्यांनी पोलीस पाटील मंजुषा मनोहर कदम यांना सांगितले. पोलीस पाटील यांनी जत पोलीस यांना कळवल्यानंतर लगेच पोलीस पथक व सांगलीतील बॉम्ब पथक दाखल झाले आहे. ह्याआधी 2017 ला अशीच घटना कुडनूर मध्ये दोन बॉम्ब सापडले होते. बॉम्ब पथक आणि सांगली व त्यांची टीम लिओ डॉग हे दाखल झाले होते. बॉम्ब ताब्यात घेऊन अधिक माहिती घेण्यासाठी सांगलीला रवाना झाले आहेत.. त्यामुळे डफळापुर कुडनूर व जत तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण व खळबळ माजली आहे.