जनतेज न्युज

जनता जनार्दन योग्य तो निर्णय करेल – निलम गोऱ्हे

प्रतिनिधी, पंढरपूर :

आता पर्यंत तरी न्यायालयाने समाधानकारक न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज पंढरपुरात व्यक्त केले.
उपसभापती निलम गोऱ्हे आज विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या. यावेळी‌ त्यांनी पत्रकारांशी बोलताना सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शिवसेनेच्या बाजूने न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
ज्यावेळी सर्व दारे बंद झाली आहेत असं वाटते त्यावेळी न्याय देवतेकडून न्याय मिळण्याची अपेक्षा असते. त्यामुळे अजून ही आम्हाला विश्वास असल्याचेही निलम गोऱ्हे यांनी सांगितले.