जनतेज न्युज

ईडीचा धाक दाखवून आपलंसं करण्याचा प्रयत्न चालू आहे – आ.अंबादास दानवे

प्रतिनिधी, औरंगाबाद : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली त्यावर आमदार अंबादास दानवे यांना प्रश्न विचारला असतात ते म्हणाले
ईडीचा धाक दाखवून अशा पद्धतीने स्वतःकडे ओडण्याचे काम काही लोक करत आहे अर्जुनराव खोतकर यांचा जालन्यामध्ये या मराठवाड्यामध्ये एक चांगल्या प्रकारे संपर्क आहे आणि चांगल्या पद्धतीने कार्य आहे परंतु अशा पद्धतीने काही जणांना ईडीचा धाक दाखवून आपलंसं करण्याचा प्रयत्न चालू आहे असं मला वाटतं त्यातलाच एक भाग आहे असे आ. अंबादास दानवे म्हणाले. मुख्यमंत्री येणार आहे म्हणून त्याचा काही परिणाम होणार आहे का या प्रश्नावर ते म्हणाले अजित ठाकरेंच्या सभांचा परिणाम झाला आहे म्हणूनच हा दौरा मुख्यमंत्री घेत आहे कारण की जो रूट आदित्य साहेबांचा होता त्याच रूटवर मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे असे अंबादास दानवे म्हणाले