जनतेज न्युज

नवीन दिशा देणारा राज्यपाल पाठवावा – अशोक लाडवंजारी

प्रतिनिधी,जळगाव : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे जळगाव शहरातून ५ हजार पत्र पोस्टाने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पाठवले असून कोशारी यांनी काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात “मुंबईतुन राजस्थानी व गुजराथी लोक जर बाहेर पडले तर मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही ” असे वादग्रस्त व बेताल वक्तव्य केल्यामुळे त्यांचा विरोधात पोस्टाने पत्र पाठवून आज पोस्ट ऑफिस बाहेर राज्यपाल यांचा विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राज्यपाल यांची मनस्थिती बिघडलेली आहे त्यामुळे केंद्रसरकारला विनंती करतो कि राज्यपाल यांना लवकरातून लवकर याठिकाण्याहून परत पाठवावा तसेच नवीन व दिशा देणारा राज्यपाल द्यावा अशी अशी केंद्र सरकार कडे अपेक्षा करतो अशी प्रतिक्रिया जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी दिली.