प्रतिनिधी, बुलढाणा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज सायंकाळी शहरातून विविध ठिकाणाहून शोभायात्रा काढण्यात आल्या यावेळी शोभायात्रेचे ठिकठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो च्या जयघोष करीत प्रतीकात्मक पुतळ्याला हार अर्पण अभिवादन करण्यात आले व शोभायात्रेत सहभागी झालेल्या मंडळांना पाणी तसेच अल्पपोहाराचे वाटप करण्यात आले. तर ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांनी काढण्यात आले यावेळी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता तर शोभायात्रा ही शांततेत पार पडली.
