जनतेज न्युज

पथदिव्यांच्या लोकार्पनावरून आमदार व नगरसेवक यांच्या मध्ये श्रेयवादाची लढाई

प्रतिनिधी, धुळे : धुळे शहरातील साक्री रोड परिसरामध्ये काल आमदार डॉ. फारुक शाह यांनी पथदिव्यांचे लोकार्पण केले होते, आता या लोकार्पण सोहळ्यावरून भाजपचे नगरसेवक हर्षकुमार रेलन आणि आमदार डॉ. फारुक शाह यांच्यामध्ये चांगलेच रणकंदन बघायला मिळत आहे. आमदार शाह यांनी केलेल्या लोकार्पणावरून भाजपचे नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.धुळ्याचे आमदार डॉ फारूक शाह हे लबाड आहेत पथदिव्यांचा निधीबाबत ते खोटे बोलले 37 लाखांच्या निधीशी त्यांचा काय संबंध..? भाजपाचे तत्कालीन आमदार असलेले अनिल गोटे यांनी तो निधी आणला होता. मी पाठपुरावा करून पथदिवे लावलेत. श्रेयासाठी आमदारांनी केविलवाणी धडपड का केली, हे समजायला मार्ग नाही. श्रेय हवे होते ना, मी दिले असते. त्यांच्या हस्तेच लोकार्पण केले असते. बंद पथदिव्यांचे लोकार्पण करून त्यांनी काय मिळविले? स्वतःचे हसू करून घेतले. मी माझ्या प्रभागात दोन चार कोटी नव्हे तर तब्बल 20 कोटी रुपयांची विकास कामे केली. त्यामुळे गटार बांधण्याचे काय सांगता, ओपन चॅलेंज देतो, प्रभागात या विकास पहा, अशी आक्रमक टोलेबाजी नगरसेवक हर्षकुमर रेलन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी काल सायंकाळी मोगलाई भागात येवून साक्री रोडवरील पथदिव्यांचे लोकार्पण केले. त्यावेळी आमदार डॉ फारुख शाह यांनी यावेळी बोलताना सांगितले की जे गटारी बांधू शकत नाही, ते श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्याने केला होता. भाजपचे नगरसेवक हर्षकुमार रेलन यांनी आज पत्रकार परिषद घेवून आ. शाह यांच्या वक्तव्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.घाईगडबडीत आमदार साहेबांनी बंदच असलेल्या फक्त 2 पथदिव्यांचे लोकार्पण फक्त आणि फक्त श्रेय घेण्यासाठी केल्या असल्याचा आरोप नगरसेवक हर्शकुमर रेलन यांनी केला. अवघ्या 37 लाख रुपयांचा लोकार्पण चा घाट आमदार शाह यांनी का घातला.? त्यांचा ह्या निधिशी कडी मात्र संबंध नाही असा आरोप नगरसेवक रेलन यांनी यावेळी केला.