जनतेज न्युज

हिमायतनगर तालुक्यातील खराब रस्त्यांमुळे प्रवाशांची हेळसांड

प्रतिनिधी, नांदेड :  हिमायतनगर तालुक्यातील वाशी कुबेर मार्केट तेलंगणात जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील वाशी घाटातून असलेल्या रस्ता वाहून गेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय नेत्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना दळणवळण करताना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि प्रवाशांची हेळसांड थांबवावी अशी मागणी या भागातील आदिवासी नेते सत्तेवर्त ढोले तसेच प्रकाश जाधव व गावकऱ्यांनी केली आहे.