जनतेज न्युज

शिंदे सरकार मधील सर्व मंत्री महाराष्ट्राला प्रगतीकडे घेऊन जाणारे निर्णय घेतील – चंद्रकांत सोनवणे

प्रतिनिधी, जळगाव : एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे शपथविधी झाल्यानंतर तब्बल 39 दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला याबद्दल शिंदे गटाचे आमदार लता सोनवणे यांचे पती माजी आमदार प्रा  चंद्रकांत सोनवणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले गेल्या 39 दिवसात शिंदे साहेबांनी चांगले निर्णय घेतले डिझेल पेट्रोलचे दर कमी केले शेतकऱ्यांसाठी पन्नास हजाराच्या अनुदान दिले सर्वसामान्य व शेतकरी हिताचे निर्णय घेतले आणि आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचे मंत्री देखील चांगले निर्णय घेतील चांगले काम करतील महाराष्ट्राला प्रगती कडे नेतील. येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्राचे मंत्रिमंडळाचे विस्तार होणार त्यात महिलांना मंत्रिपद दिले जाणार महिलांच्या मान राखणाऱे य सरकार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महिलांचे मान राखणारे आहेत आमदार म्हणून त्या महिलांना संधी दिली जाणार आहे.शिंदे साहेब व फडणवीस साहेब यांनी एकत्र बसून संजय राठोड यांच्या मंत्री पदा संदर्भात निर्णय घेतला आहे एखादी व्यक्तीवर आरोप झाला तो सिद्ध थोडा झाला आहे.हिंदुत्व हा विषय घेऊन आदरणीय बाळासाहेबाचं हिंदुत्व घेऊन चाळीस लोकं बाहेर निघालोय प्रत्येकाला वाटतं आपण मंत्री व्हायला पाहिजे नाराजीचा सूर असं काही नाही थोडसं क्षनिक असतं प्रत्येकाला वाटतं मला दिल गेल पाहिजे.