जनतेज न्युज

सर्वसामान्य नागरिकांचं होत कि त्यांच्या घरावर सुद्धा तिरंगा ध्वज फडकला पाहिजे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रतिनिधी, औरंगाबाद : अमृत महोत्सव साजरा करताना स्वराज्य महोत्सव आणि हर घर तिरंगा या मोहिमे च्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांची स्वप्न होती की त्यांच्या घरावर सुद्धा तिरंगा ध्वज फडकला पाहिजे मात्र शासकीय नियमांमुळे हे शक्य होत नव्हते. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हर घर तिरंगा ही मोहीम आजादी का अमृत महोत्सव नेहमी त्याने संपूर्ण देशात राबवण्याचे ठरवले आणि नागरिकांना या योजनेमध्ये सहभाग होण्याचे आवाहन केले त्या आव्हानाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून 13 अगस्त ते पंधरा ऑगस्ट या तीन दिवस सर्वसाधारण नागरिकांच्या घरावरती तिरंगा ध्वज फडकताना दिसणार आहे.
या मोहिमेला जिल्हा प्रशासनाकडून चांगला प्रतिसाद मिळत असून यामध्ये विविध तहसीलदार नायब तहसीलदार उपविभागीय अधिकारी त्याचबरोबर महसूल प्रशासनाचे विविध अधिकारी यांनी मोठे सहकारी केले असून त्या अनुषंगाने नागरिकांचे मोठ्या प्रतिसाद मिळत आहे आज स्वराज्य महोत्सव राष्ट्रीय गीत गायन साठी मोठा प्रतिसाद मिळाला असून हे सर्व यश जिल्हा प्रशासनाचे असल्याचे त्यांनी आज रोजी पत्रकारांची बोलताना सांगितले आहे.