प्रतिनिधी , सांगली : वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवर पाणी असताना ही पुल ओलांडणाऱ्या एकास कोडोली पोलिसांनी दिला प्रसाद चार दिवसांपासून संततधार पाऊस व चांदोली धरणातून 5628 पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आज सकाळी ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीच्या पुलावरून दोन ते तीन फूट पाणी वाहत आहे त्यामुळे कुरळप पोलिसांच्या वतीने आज सकाळपासून खबरदारीचा उपाय म्हणून ब्रॅकेट लावून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे बंदोबस्ताला असणाऱ्या पोलिसांचा डोळा चुकवून एक जण आपला जीव धोक्यात घालून पाण्यातून पुलाच्या पाईपला धरत कोल्हापूर जिल्ह्यातील निलेवाडी कडे जात असताना कुरळप पोलीस स्टेशनचे सचिन मोरे यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही न जुमानता तो व्यक्ती पुढे चालत राहिला हा सर्व प्रकार दुसऱ्या बाजूच्या नदीच्या काठावरून कोडोली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पाहत होते तो व्यक्ती जेव्हा निलेवाडी बाजूच्या साइटवर गेला तेव्हा तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला चांगला काठीचा प्रसाद दिला.
