जनतेज न्युज

बुलडाण्यातील कुख्यात डॉन सैय्यद शकील बुलडाणा पोलिसाच्या जाळ्यात

प्रतिनिधी , बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात घरफोड्या व वाहने चोरून पोलिसांची झोप उडविणाऱ्या तसेच पोलिसांना आव्हान देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड सैय्यद शकील सैय्यद युसुफ च्या बुलढाणा पोलिसांनी मुस्क्या आवळल्या आहेत.. आरोपी सैय्यद शकील याने जिल्ह्यात 3 झरफोड्या व 3 वाहने, अशा तब्बल 6 गुन्ह्याची उकल करण्यातही पोलिसांना यश आले. ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. सन 2012 मध्ये चोरीच्या पहिला गुन्ह्यात आरोपी झालेल्या सैय्यद शकील सैय्यद युसुफ याने गेल्या 10 वर्षांत महाराष्ट्र पोलीस दलाच्या नाकी नव आणले आहे. राज्यातील जालना, औरंगाबाद, जळगाव खांदेश, अमरावती, नाशिक, पुणेसह अन्य जिल्ह्यात सैय्यद शकीलने एक, दोन नव्हे तर तब्बल 50 गुन्ह्यांना अंजाम दिला आहे. उपरोक्त जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात घरफोडी, दुचाकी व चारचाकी वाहनांची चोरीसह विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती ठाणेदार काटकर यांनी दिली आहे.दरम्यान, आरोपीस 7 ऑगस्ट रोजी बुलडाणा न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला 9 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. . पोलीस कोठडीत असतांना आरोपी सैय्यद शकील सैय्यद युसुफ याने बुलडाणा शहरातील विविध परिसरात गेल्या काही महिन्यांत ३ घरफोड्या व 3 वाहन चोरी, अशा सहा नविन गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच एक दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केली. प्रकरणी पोलिसांचा बारकाईने तपास सुरु असुन आरोपीकडून आरोपीकडून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली आहे.