प्रतिनिधी , बुलडाणा : संपुर्ण भारत देषामध्ये स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा होतोय.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी,पंडित जवाहरलाल नेहरु,सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक ज्ञात-अज्ञात थोर देशभक्तांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीनिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत असतांना देषाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या थोर देशभक्तांचा खरा इतिहास जनता जनार्दनापर्यंत पोहचविण्यासाठी शहरात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम राबवून ‘आजादी गौरव पदयात्रा’ काढण्यात आली ऐतीहासिक क्रांतीदिनी सकाळी शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यान येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाला माल्यार्पण केले व मा. आ.दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते ध्वजारोहण करुण पदयात्रेला सुरुवात करण्यात आली व शहरातील प्रमुख मार्गाने पदयात्रा काढण्यात आली यामध्ये सर्वांनी पांढरा पोषाख व गांधी टोपी परिधान केले होते.
