जनतेज न्युज

विदर्भ राज्य आंदोलन पक्षाने लॉन्ग मार्च आणि धरणे आंदोलन

प्रतिनिधी , नागपूर :  नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचा औचित्य साधत विदर्भ राज्य आंदोलन पक्षाने लॉन्ग मार्च आणि धरणे आंदोलन करत वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी केली. येणाऱ्या 2023 पर्यंत विदर्भ राज्य वेगळा झाला पाहिजे त्यासाठी केंद्रातील सरकारने मदत करावी अन्यथा विदर्भ राज्य देता की सत्तेतून जाता असा प्रश्न विदर्भवाद्यांनी विचारला. विदर्भ राज्यच आंदोलन गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही विदर्भाचा अनुशेष वाढत आहे विदर्भाचा विकास होत नाही त्यामुळे आता विदर्भ राज्य घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही .