जनतेज न्युज

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रतिनिधी , सांगली : सांगली येथील 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्यासह प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्ह्याच्या स्वातंत्र्य दिनास वेगळे महत्त्व आहे. स्वातंत्र्य चळवळीत या जिल्ह्यात 21 हुतात्मे झाले. त्यांची आठवण या कार्यक्रमात करण्यात आली. क्रांतिसिंह नाना पाटील, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, जी डी बापू लाड, नागनाथ नायकवडी यांच्यासह चळवळीत कार्यरत राहिलेल्या प्रमुख व्यक्तींचा उल्लेख करण्यात आला.