प्रतिनिधी, औरंगाबाद : अग्नीवीर भरतीसाठी औरंगाबाद शहरांमध्ये आलेल्या तरुणांचे अतोनात हाल सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. औरंगाबाद शहरातल्या विद्यापीठाच्या मैदानावर अग्नी वीरांची भरती सुरू आहे. यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून तरुणांची अलोट गर्दी लोटली आहे. मात्र या तरुणांना ना राहण्याची, ना खाण्याची, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे. तर मुलांना 10 रुपयांची पाण्याची बॉटल 30 रुपयाला घ्यावी लागली. त्यामुळे रस्त्यावरती मिळेल तिथे हे तरुण झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे भावी जवानांचे कसे हाल सुरू आहेत ही परिस्थिती समोर आली आहे. तर भविष्यात देश ज्यांच्या हातात सुरक्षित राहणार आहे अशा तरुणांना रात्रभर रोडवर झोपून न पाणी पिता आणि न काही खाता रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे.
