जनतेज न्युज

स्व. विनायक मेटेंना तालुका प्रशासन व सर्वपक्षीय नेत्यांकडुन श्रद्धांजली

प्रतिनिधी, बीड : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार स्वर्गीय विनायकराव मेटे यांना बीड जिल्ह्यातील गेवराई येथे तालुका प्रशासन व राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली यावेळी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते . शहरातील शास्त्री चौक येथे आयोजित केलेल्या शोकसभेला माजी राज्यमंत्री बदामराव पंडित,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित,माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे, तहसीलदार सचिन खाडे,प्रशांत जाधवर, पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार,डाॅ महादेव चिंचोळे,कैलास माने  यांच्या सह वकिल , पत्रकार,स्थानिक प्रशासन , सामाजिक राजकीय कार्यकर्ते आदी उपस्थित होते.या शोक सभेवेळी मेटे साहेबांच्या आठवणींना उजाळा देत स्व विनायकराव मेटे हे समाजासाठी समाजातील प्रत्येक घटकांसाठी आमदारासह सामाजिक कार्यकर्ता म्हणुन कार्य करत राहिले.मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न म्हणुन मराठा आरक्षणासाठी स्व.विनायकराव मेटे यांची सतत धडपड असल्याचे पहायला मिळत होते मात्र आज विनायकराव मेटे हे आपल्यात नसल्याचे सांगत उपस्थित सर्वांनी दुःख व्यक्त केले.