प्रतिनिधी, औरंगाबाद : हडको टीव्ही सेंटर येथील एका मंगल कार्यालयामध्ये 20 एप्रिल 2022 रोजी हातपाय बांधून मारहाण करून निर्गुणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली होती या घटनेला चार महिने उलटले आहे या प्रकरणी 18 जुलै रोजी आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल झाले आहे मात्र आजपर्यंत महाराष्ट्र राज्य शासनाने आमच्या परिवारास कोणतीही आर्थिक मदत केली नाही मला एक मुलगा एक मुलगी आहे या दोघांचा सांभाळ करण्याची त्यांची शिक्षण व पालन पोषण करण्याची जबाबदारी ही माझ्या एकटीवर येऊन ठेपली आहे यामुळे आज 18 -8 -2022 रोजी मी उपोषणाला बसत आहे तरी शासनाकडे मी कुटुंबनिर्वाह चालवण्यासाठी 50 लाख रुपयाची आर्थिक मदत, आमच्या कुटुंबाला राहण्यासाठी शासनाने घर द्यावे ,सामाजिक न्याय विभाग किंवा मंत्रालयाच्या विभागाच्या वतीने सरकारी नोकरी देण्यात यावी माझे मुलं व मुलांचे पालन पोषण शिक्षण करण्यासाठी पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी आज उपोषणाला बसले असल्याचे मृत मनीषा यांच्या पत्नी शितल मनीष आव्हाड यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी केली आहे.
