जनतेज न्युज

वंचित बहुजन आघाडीला मोठे खिंडार; ऊसतोड मजूर प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर यांचा वंचितला रामराम

प्रतिनिधी, बीड : वंचित बहुजन आघाडीला एक मोठा धक्का बसला आहे. ऊसतोड मजूर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षातील अनेक जण त्रास देत आहे. त्यामुळे मी पक्ष सोडत आहे. माझे वैर विठ्ठलाशी नाही मात्र मी पक्षातील बडव्यांमुळे त्रस्त झालो आहे.म्हणून मी वंचित बहुजन आघाडी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शिवराज बांगर यांनी दिली. आज ते मुंबईत मनसेत जाहीर प्रवेश करीत आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांच्यासह अनेकांनी मला त्रास दिल्याचा आरोप शिवराज बांगर यांनी केला. बांगर यांच्या पक्ष सोडण्याने वंचित बहुजन आघाडीला राज्यातून मोठा खिंडार पडल आहे.