प्रतिनिधी , औरंगाबाद : शहराचे आराध्य दैवत संस्थान गणपती येथे शिवसेनेचे माजी खासदार व उपनेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते संस्थान गणपतीची आरती केली व उत्साह मूर्तीची पूजा केली यावेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती यावेळी चंद्रकांत खैरे यांनी यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे जनतेला आव्हान केले संस्थान गणपती हे एक पावन गणपती म्हणून ओळखले जाते त्या ठिकाणी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराच्या महानगरपालिकेमध्ये सत्ता येऊ दे म्हणून नवस केला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे त्यावेळेस सोन्याचा मुकुट सुद्धा देण्यात आल्या होत्या अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रफुल मालानी यांनी दिली यावेळी औरंगाबाद शहराचे माजी महापौर नंदकुमार घडले हे उपस्थित होते त्यांनी औरंगाबाद वासियांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
