प्रतिनिधी , धुळे : धुळे शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाला मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली असून, शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड येथे नागरिकांनी गणेश मूर्ती सह पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावा नंतर तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा होत आहे. यानिमित्त संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात देखील गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.धुळे जिल्हातील मानाचा समाजाला जाणाऱ्या खुनी गणपतीची देखील वाजत गाजत पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. सन 1895 साली या गणपतीच्या उत्सवाला लोकमान्य टिळकांचे शिष्य खंबोटे गुरुजी यांनी सुरुवात केली नवसाला पावणारा खुनी गणपती म्हणून या गणपतीची शहरासह जिल्ह्यात आणि राज्यात ओळख आहे, गणपतीच्या दर्शनाला महाराष्ट्र सह विविध राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात.1904 साली धुळे शहरात दंगल झाली होती यावेळी काही लोकांचा मृत्यू झाला होता यामुळे या गणपतीला कुणी गणपती असे तर या भागात असलेल्या मशीदीला खुनी मज्जिद असे म्हटले जाते.
धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड येथे सकाळपासून नागरिकांनी गणेश मूर्ती सह पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती यंदा शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांवर बंदी घातली असली तरी दुसरीकडे मात्र शाडू मातीच्या मुर्त्यांची किंमत महागल्याने घरगुती गणेशोत्सवासाठी नागरिकांकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांना पसंती देण्यात येत आहे. ढोल ताशांच्या गजरात यावेळी नागरिकांनी वाजत गाजत गणेश मूर्ती आपल्या घरी नेल्या या माध्यमातून बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. धुळे शहरात आतापर्यंत जवळपास 50 असून अधिक मंडळांनी परवानगी घेतली असून गणेशोत्सवासाठी जवळपास एक हजाराहून अधिक पोलिसांचा तसेच होमगार्ड यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मानाचा समजला जाणाऱ्या खुनी गणपतीची देखील शहराच्या मुख्य भागातून मिरवणूक काढत विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
