जनतेज न्युज

तणनाशकाच्या दरात दुपटीने वाढ होऊन्न सुध्दा गवत मरत नाही; शेतकरी त्रस्त

प्रतिनिधी , वर्धा : वर्धा जील्हातील परीसरात शेतकरी बांधव शेतात गतवत वाढल्यामूळे तणनाशक ची फवारनी करीत आहे. मात्र शेतातील गवत मरतच न्नाही त्याउलट पराटी चे झाड फवारनी केल्याने कोमीजले व लाल पडत आहेत . तणनाशक चे दर प्रति लीटर 620 रू आहेत मागील वर्षी पेक्षा या वर्षी दुप्पट कीमत वाढल्यामूळे शेतकऱ्यांना खरेदी करने खुप अवघड झाले आहे या वर्षी खुप ज्यास्त प्रमानात पाणी आला त्यामूळे शेती मध्ये तण झपाट्याने वाढत आहेत नींदन करन्या साठी पुरेसा वेळ शेतऱ्याकडे राहीला नाही गेल्या दीड महीन्या पासुन पावसाने चांगलाच कहर केल्याने शेतकऱ्यांचे कंबरठे पूर्ण पणे मोडले आहे. तीन दा ज्यास्त अतिवृष्टी झाल्याने शेतशीवारात पीकांची वाढ खुंटली असून पीका पेक्षा तणच ज्यास्त वाढले आहे. शेतकऱ्याने निंदनाचा खर्च टाळून तणनाशक ची फवारनी सुरु केल्याने या वर्षी तनाशक ची वीक्री खूप ज्यास्त प्रमानात वाढली आहे . बाजार पेठे मध्ये बोगस तंनाशक आले आहेत असा आरोप शेतकरी बांधव करीत आहेत .
कीत्तेक शेतकरी यांच्या शेतामध्ये पाणी असल्या मूळे शेतकऱ्याना निंदन व फवारणी करण्यासाठी खुप अडचण येत आहे त्यामूळे पीकाच्या वर मोठे मोठे गवतच वर येत आहेत अशा परीस्थीतीत तणनाशक फवारनी करणे शेतकरी करत त्यामूळे तणनाशक विक्री वाढल्याने दर ही वाढले आहेत अशात मात्र शेतकरी भरडला जात आहे पहीले पुराच्या पान्याने व अतीवृष्टी ने मारले व आता औषधीचे भाव दुपट भाव वाढले आहेत त्यामूळे शेतकरी हवा दील झाला आहे .ऊधार वाडी करून तणनाशक खरेदी करून फवारनी शेतकरी करीत आहेत .बोगस तणनाशकची शासनाचे व कृषी वीभागाने पाहनी करावे अशी मागणी शेतकरी बांधव यांनी केली आहे .