जनतेज न्युज

वळदगांव खामनदी नळकांडी पुलाला मंजुरी मिळूनही कामाच्या श्री गणेशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद तालुक्यात येत असलेल्या वळदगाव वासियांना प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे जीव मुठीत घेऊन खाम नदीवरील नळकांडी पुलावरून प्रवाही पाण्यामधून प्रवास करावा लागत आहे शासनाकडून कमानीच्या पुलाच्या कामाला मंजुरी मिळूनही प्रशासन पुलाच्या कामाचा श्रीगणेशा करीत नसल्याने गावकऱ्यांकडून प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर रोष व्यक्त केला जात आहे अनेकदा येथील गावकऱ्यांना तसेच कामगार वर्गांना ये-जा करताना प्रवाही पाण्यात वाहून गेल्याने जीव गमवावा लागला आहे. गेल्या अनेक वर्षापासून याच धोकादायक पुलावरून गावकरी प्रवास करत असून मंजुरी मिळालेल्या पुलाचे काम मायबाप प्रशासनाने तात्काळ हाती घेऊन गावकऱ्यांची जीवघेणी प्रवास करण्याची समस्या तात्काळ निकाली काढावी अशी मागणी वळदगाव चे सरपंच अमरसिंग राजपूत यांनी प्रशासनाकडे केली.