जनतेज न्युज

पुण्यातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवरुन मुंबई उच्च न्यायालयात याचिका

प्रतिनिधी, पुणे : पुण्याच्या मानाच्या गणपतीपुढे इतर गणपती मंडळांना जाऊ दिले जात नसून त्यांच्याबाबत मोठ्या गणपती मंडळांकडून भेदभाव केल्या जात असल्याचे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.असीम सरोदे यांच्यामार्फत दाखल केली याचिका विसर्जन मिरवणुकांच्या वेळी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाचे पाच गणपती मंडळच जातात. त्यानंतरच इतरांनी जावे हा रूढी-परंपरा व प्रथेचा भाग म्हणजे कायदा नाही. त्यामुळे इतर लहान गणपती मंडळांना विसर्जनासाठी लक्ष्मी रस्ता वापरण्यावर असणारी बंधने म्हणजे बेकायदेशीरता व संविधानातील कलम 19 नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे, याबाबतचा आरोप करणारी याचिका बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी अॅ ड. असीम सरोदे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.मानाचे गणपती मिरवणूक पूर्ण करायला खूप वेळ लावतात. मागून येणाऱ्या लहान गणपती मंडळांवर पोलीस गुन्हे दाखल करतात. अशा व्यथा याचिकेतून मांडल्याचे याचिकाकर्ते शैलेश बढाई यांनी सांगितले आहे. त्यांना अनेक लहान लहान गणपती मंडळांचा पाठींबा असल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले.