जनतेज न्युज

महिलांवरील अत्याच्यार रोखण्यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे – रूपाली चाकणकर

प्रतिनिधी, उसमानाबाद : तुळजापुर तालुक्यातील सिंदफळ येथील अल्पवहिन पिडीत सहा वर्षीय बालिकेची शासकीय रुग्णालयात भेट घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आल्या होत्या . पिडीतेच्या भेटीनंतर समाजात महिलांवरील अत्याच्यार रोखण्यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगितले. मात्र याच वेळी सदर घटना घडताना प्रत्यक्ष काही कामगार महिलांनी आरोपीस रंगेहाथ पकडून पोलीसांच्या स्वाधीन केल्याचे त्या विसरल्या. आरोपी पुर्वी महिला अत्याच्यार व बलात्कार प्रकरणातील सराईत शिक्षा भोगलेला गुन्हेगार असताना पोलीस प्रशासनाने त्यावर नजर न ठेवल्याने ही घटना घडल्याकडे दुर्लक्ष करत पोलीस प्रशासनाची बाजु घेतली तर चित्रा वाघ यांनी अद्याप कसलाच प्रश्न केला नाही म्हणताच सत्तेत असताना वेगळे व विरोधात असताना वेगळे म्हणत मला कोणा विषयी काही बोलायचे नाही असे म्हणत टिका केली. कायद्याची कडक अंमलबजावणी होणं फार गरजेच आहे. समाजात त्रास दायक असणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देणं योग्य राहिल.समाजातील सर्वानी पुढे येऊन काम करणं गरजेच आहे.