जनतेज न्युज

त्या लहानग्याचा आवाज केडीएमसीर्पयत पोहचणार का ?

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : गेल्या चार दिवसापासून संध्याकाळी मूसळधार पाऊस पडतो. याचा फटका नागरीकांना बसत आहे. मात्र कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरातील संत तुकारामनगरात पावसामुळे नागरीकांच्या घरात गुडघ्या इतके पाणी साचत आहे. घाण पावसासोबत कचरा घरात येतो. घरातील वस्तू खराब झाल्या आहेत. एका घरात पाणी शिरल्याने लहान मुलाचा आणि त्याच्या कुटुंबियाचा व्हीडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. घरात पाणी शिरल्याचा चौथा दिवस आहे. गुडघ्या इव्हढे पाणी भरले आहे. केडीएमसीला काही कळत नाही. घरातील सामान खराब झाले आहे या लहानग्या सवाल तरी केडीएमसीच्या कानापर्यंत पोहचणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.