जनतेज न्युज

शेतातील ट्रान्सफॉर्मर उतरून संपूर्ण साहित्य चोरी ; नेहमी वर्षातून एक दोनदा होतो हा प्रकार

प्रतिनिधी , जळगाव : बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवे वरील चोपडा तालुक्यातील मंगरूळ फाट्या जवळील उसाच्या शेतात खांब्यावरील ट्रांसफार्मर खाली उतरून ट्रांसफार्मर मधील ऑइल केबल कॉईल असे संपूर्ण साहित्याची चोरी झाली असल्याने या ट्रान्सफॉर्मरवर असलेले शेतकऱ्यांना शेतात पाणी भरण्यासाठी अडचण निर्माण झाले . चोपडा तालुक्यासह जिल्ह्यातील बऱ्याच भागात पाऊस नाही. चोपडा तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतातील पीक सुकू लागले. ज्या भागात अधून मधून पाऊस झाला आहे. त्या भागातील पिकांची परिस्थिती काही प्रमाणात जेमतेम असली तरी इतर भागात शेतातील पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. शेतकरी शेतात पाणी भरण्यासाठी आले असता लाईट नसल्याचे पाहून ट्रांसफार्मर कडे आले असता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना खांबावरून ट्रान्सफॉर्मर खाली उतरून त्यातील संपूर्ण साहित्य चोरी झाल्याचे निदर्शनात आले. सदर घटना महावितरण चे अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पंचनामा केल्याचे सांगितले परंतु पंचनामा शेतकऱ्यांसमोर झाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वर्षातून नेहमी एक दोनदा हा प्रकार घडत असतो. ट्रांसफार्मर उसाच्या शेतात असल्याने चोरी करणाऱ्यांना ही सोयीचे जात असल्याने शेतकऱ्यांनी हा ट्रान्सफॉर्मर रोडालगत हलवावा जेणेकरून लोकांच्या निदर्शनात येईल व हा प्रकार होणार नाही अशी मागणी केली आहे. कारण ट्रांसफार्मर चोरी गेल्यानंतर त्यासाठी खूप शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महावितरणाचे अधिकारी मागील बिल भरण्याचं हट्ट धरतात आधी पाऊस नसल्याने शेतकरी पिकं जगवण्यासाठी धडपड करीत आहे. त्यात असं संकट उभे राहत असल्याने करायचं काय हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे.