प्रतिनिधी , जळगाव : चोपडा मतदारसंघात २०१९ मध्ये शिवसेने कडून लता सोनवणे विधानसभेवर निवडून आल्या होत्या. लता सोनवणे यांची जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे तक्रार माजी आमदार जगदीश वळवी यांनी जात पडताळणी समितीकडे केली होती. तिथे ते अवैध ठरले त्यानंतर हाय कोर्टामध्ये त्यांनी अपील केलं. हायकोर्टामध्येही सर्टिफिकेट अवैध असल्याचा निकाल दिल्याने ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने ही हायकोर्टाचा निकाल कायम ठेवून त्यांनी केलेले अपिल फेटाळल्याने माजी आमदार जगदीश वळवी यांनी सुप्रीम कोर्टाचा निकालाचे स्वागत केलेले आहे. आता प्रशासनाने कोर्टाचा दिलेल्या निकालानुसार पुढील कारवाई करावी अन्यथा ते स्वतः निवडणूक आयोग व राज्यपाल यांच्याकडे जाणार असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावरून चोपडा मतदार संघामध्ये लता सोनवणे यांच्या आमदारकी रद्द केल्या बद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर माजी आमदार जगदीश वळवी यांच्या निवासस्थानी भेटणाऱ्यांची गर्दी होताना दिसत होती.
