जनतेज न्युज

अमरावतीत क्रीडा स्पर्धेसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

प्रतिनिधी , अमरावती : सहा महिन्यांपासून खेळाचा नियमित सराव सुरु आहे. मात्र क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत नसल्याने खेळाडूंचे नुकसान होत असून क्रीडा गुण तसेच सेवा भरती मधील ५ टक्के आरक्षण आदीं पासून खेळाडू वंचित आहेत , त्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने विविध खेळांचे खेळाडू यांनी क्रीडा गणवेश घालून अमरावतीच्या राजकमल चौकात सराव करून प्रतीकात्मक आंदोलन केलं, शालेय विद्यार्थी खेळाडुंना सेवाभरती करीता असलेला ५%खेळाडु आरक्षणाच्या लाभा पासुन वंचीत रहावे लागणार आहे.त्यामुळे शासनाच्या परवानगीने तातडीने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुका ते राज्यस्तरावर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.