प्रतिनिधी , पुणे : आरोपी मंथन भोसले हा इंजीनियरिंग चा विद्यार्थी होता. साथीदार अनिकेत समदरच्या मदतीने खुन करण्यात आला. प्रेमाला सतत होत असलेला नकार आणि वीस कोटीची खंडणी या उद्देशाने हा खून करण्यात आला आहे
गुरुवारी आदित्यचे अपहरण केले होते. त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी वेगाने तपास केला आणि ते आरोपी पर्यंत पोहचले कारण सुरुवातीपासूनच मंथन उडवा-उडवी ची उत्तर देत होता. यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावरती अधिकच बळावला होता. आदित्यच्या एका रिलेटिव्ह सोबत मंथनचे प्रेम संबंध होते परंतु त्यांच्या या प्रेमाला आदित्यच्या संपूर्ण कुटुंबाचा विरोध असल्याने बदला घेण्यासाठी त्याने हा कट रचला होता. प्रेम प्रकरणाला विरोध होत असल्याच्या रागातून आणि वीस कोटींची खंडणी उकळण्यासाठी एका आठ वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याची निर्घृण खून करण्यात आला.
