प्रतिनिधी, जळगाव : चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील रहिवासी लताबाई दिलीप कोळी ह्या शुक्रवारी ता.९ रोजी तापी नदी काठावर आपल्या शेतात शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या. तसा चोपडा तालुका म्हटलं म्हणजे पहाडी क्षेत्र आणि त्यातल्या त्यात हिंसक प्राण्यांचा वावर हा निश्चित असतो. अशातच लताबाई यांच्या नजरेस पडेल ते भयानक दृश्य, पहाते तर काय चक्क बिबट्या शिकार करण्यासाठी कुत्र्याच्या पाठीमागे लागलेला. अशातच बिबट्या आपलीही शिकार करेल या भीतीने त्यांनी तेथुन नदीच्या दिशेने वाटचाल करीत दुथडी भरून वाहणाऱ्या तापी पात्रात उडी घेतली. डोळ्यासमोर एकच प्रश्न की बिबट्याच्या तावडीतून जीव कसा वाचेल? सुमारे 60 किमी लताबाई कोळी ह्या पाण्याचा प्रवाहात वाहत वाहत अमळनेर तसेच पाडळसरे धरण ओलांडून थेट अमळनेर तालुक्यातील सीमेवरील निम नदी काठावर दुसऱ्या दिवशी नाविकांना केळीच्या खोडाला मिठी मारलेल्या जिवंत अवस्थेत आढळून आल्या. लताबाई यांनी घडलेला प्रकार कथित केल्यानंतर नाविक बांधवांच्या अंगावर शहारे आले. त्यांनी लागलीच लताबाई कोळी यांना उपचारासाठी मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व पुढील उपचारार्थ अमळनेर ला हलविण्याचे सांगितळे . त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना पाचारण करून स्वाधीन केले. धाडसी लताबाई यांच्या धैर्यची सर्वत्र चर्चा जिल्ह्यात नाही तर राज्यभरासह माहिती पडल्याने काळजाचा ठोका चुकविनारी ही घटना ऐकणा-याला सुरुवातिला धक्का देत आहेच. मात्र लताबाई यांचा हा पाण्यातला संघर्ष पाहून धैर्यशील या महिलेला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी उत्सुकता लागलेली पाहवयास मिळत आहे. दरम्यान सायंकाळी ते रात्र व सकाळ पर्यंत सुमारे पंधरा तास पाण्याच्या प्रवाहात वाहत येत मरणच्या दाढेतून परत आल्याने त्यांचे धैर्य खरोखर धाडसी महिलेचे असल्याने त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. म्हणतात ना ,”देव तारी त्याला कोण मारी” असाच काहीसा अनुभव त्यांना आला.
