प्रतिनिधी , पुणे : विजय लोणके / पुणे महानगरपालिकेचे जवळील एका गटई कामगार आला त्याचा व्यवसाय करण्यासाठी दरमहा दोन हजार रुपयांची लाच मागून, खंडणी मागून, त्यांना सुनील चराटे यांना पुणे महानगरपालिकेच्या कार्यात येता-जाता जातीवरून शिवीगाळ करून त्यांची सातत्याने मानहानी केल्याप्रकरणी रमेश खामकर याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तथापि गुन्हा दाखल होऊन आज दोन महिन्यापेक्षा कालावधी उलटून गेलेला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता रमेश खामकर या जाती वाद्याला अटक करण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त रमाकांत माने यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली आहे. आज दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग यांच्या कार्यालयामध्ये पीडित फिर्यादी सुनील चराटे यांना बोलावून घेऊन पुणे महापालिकेत जवळील सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. तथापि सदरील सीसीटीव्ही फुटेज संशयास्पद असून, जुलै महिन्यातील नाहीत. तसेच दिनांक 8 व 16 जुलै 2022 रोजी रमेश खामकर याने पुणे महानगरपालिकेचे एलबीटी कार्यालयाजवळ पीडित फिर्यादी सुनील चराटे यांना धमकी दिली होती. अरे तीन ते चार वेळेस रमेश खामकर यांनी सातत्यपूर्वक जातीवरून शिवीगाळ करणे, व्यवसायावरून घालून पाडून बोलणे आशा कृत्याला कंटाळून पीडित ही यादी यांनी आरोपी रमेश खामकर याच्या दुचाकी वाहनला पाठीमागून जोरदार पकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच रमेश खामकर यांचे विरुद्ध पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कळवले होते. या सर्व बाबी सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आलेल्या नाहीत, असा आरोप पीडित फिर्यादी सुनील चराटे यांनी केला आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. रमाकांत माने हे जाणीवपूर्वक आरोपीला संरक्षण देत असून सरळ सरळ ॲट्रॉसिटी कायद्याची जाणीवपूर्वक पायमल्ली करीत आहेत. पूर्वक आरोपीला अटक न करता कायद्याच्या तरतुदींना हरताळ फासण्याचे काम करीत असल्याचा आरोप संविधान परिषदेचे अध्यक्ष श्री. विजय लोणके यांनी केला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग हे जाणीवपूर्वक आरोपीला अटक करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा निषेध व्यक्त करून त्याबाबतचा जवाब फिर्यादी सुनील चराटे, संविधान परिषदेचे अध्यक्ष श्री. विजय लोणके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसात जबाब नोंदवलेला आहे.
पीडित फिर्यादी श्री. सुनील चराटे यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत न्यायाचा लढा आम्ही लढवणार आहोत, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. साहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग यांनी दलितांना न्याय देण्याच्या हेतूने प्रयत्न करणे आवश्यक असून कायद्या द्वारा स्थापित कायद्याची परिणाम कारक अंमलबजावणी करून, जातीयवादी रमेश खामकर याला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेतील तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता रमेश खामकर या जातीवादीला अटक करण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग रमाकांत माने यांच्याकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ.
पुणे क्राईम न्यूज चे पुणे शहर पोलिसांना काही प्रश्न-
1. पुण्यातील दलितांना न्याय देण्यात पुणे शहर पोलीस अपयशी.
2. मोठ्या शहरात वास्तव्य करीत असताना देखील कष्टकरी दलित समाजाला न्याय मिळत नसेल तर ग्रामीण भागामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात न्याय कसा मिळत असेल?
3. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीत असताना पुणे शहर पोलीस टाळाटाळ का करीत आहेत?
4. सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग रमाकांत माने दलितांचा विरुद्ध कपटकारस्थान का करीत आहेत? त्यांना गृहमंत्रालयाने आदेश दिले आहेत का? कोणाच्या सांगण्यानुसार रमाकांत माने आरोपीला अटक करत नाहीत? पीडित फिर्यादीने दिलेले पुरावे नष्ट केले जात आहेत का? पीडित फिर्यादीचा छळ पुणे शहर पोलीस का करीत आहेत? आरोपीला अटक होणार तरी कधी? संपूर्ण पुणे शहरात गणेशोत्सव साजरा होत असताना पीडित फिर्यादी व त्यांचे मित्र अकरा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चौकातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात विना अन्न पाण्याचे बसवून ठेवले? हा पुणे शहर पोलिसांचा जातिवाद नाही का.
