जनतेज न्युज

मेडिकल दुकानात चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद

प्रतिनिधी, नाशिक : येवला शहरातील विंचूर चौफुली येथील गणेश मेडिकल मध्ये चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून या मेडिकल वरील छतावर जाऊन चोरट्याने पहारीच्या साह्याने छतावरील भिंत तोडत आत प्रवेश करत चोरी केली. जवळपास 50 हजार रुपयांच्या आसपास मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला असून मेडिकल दुकानात चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे