प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठण येथे जाहीर सभा होणार असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघांमध्ये जंगी स्वागताची तयारी सुरू केली आहे. जागोजागी क्रेनच्या साह्याने हार घालून जंगी स्वागत करण्यात येणार आहे. काही उत्साही कार्यकर्त्यांनी चितेगाव मारोळा बिडकीन येथे एक क्विंटल पेढे व लाडूचा तुला मुख्यमंत्र्यांना देण्याचे ठरविले आहे. त्याचीही जाहीर तयारी सुरू आहे. चितळेगाव ही नगरी औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे . तर गावातील विविध समस्या जसे की, कंपन्यांच्या समस्या, कामगारांच्या समस्या, गावातील रस्त्यांच्या समस्या, अश्या समस्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर गावकरी मांडणार आहेत.
