प्रतिनिधी, जालना : जालन्यातील जांब समर्थ येथील राममुर्ती चोरीला 22 दिवस उलटले आहे मात्र या प्रकरणी अजून चोरीला गेलेल्या मूर्ती अजूनही सापडल्या नसून आरोपीही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.त्यामुळे मूर्ती चोरीचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडे द्यावा या मागणीसाठी काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.रामाच्या नावावर निवडून आलेल्यांनी मूर्ती चोरी प्रकरणी राजकारण करू नये असा सल्लाही गोरंटयाल यांनी विरोधकांना दिलाय.पोलिसांना मूर्ती शोधण्यात येत्या 15 दिवसांत यश आलं नाही तर जिल्हाभरात आंदोलन केलं जाईल असा ईशारा देखील गोरंटयाल यांनी दिलाय.
