जनतेज न्युज

आम आदमी पार्टी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक ताकदीने लढणार – धनंजय शिंदे आम आदमी पार्टी

प्रतिनिधी, जालना : आम आदमी पार्टी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक जालना जिल्ह्यात ताकदीनं लढणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीच्या प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.आज जालन्यात आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.या बैठकीत प्रदेश पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले.काही दिवसांपूर्वी जालना शहरातील स्टील कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या.त्यानंतर काही राजकिय नेते जालन्यात स्टील उद्योजकांवर दबाव आणत असून स्टील उद्योगांमध्ये पार्टनरशिप मागत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.या उद्योजकांशी आम्ही चर्चा करणार असून येथील वातावरण भयमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच देखील शिंदे यांनी म्हटलं आहे.या उद्योजकांना वाचवणं आणि संरक्षण देणं हे सरकारचं काम आहे मात्र सरकार या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचं देखील शिंदे यांनी म्हटलं आहे.