जनतेज न्युज

चोपडा तालुक्यात दीर्घ कालावधीनंतर पावसाचे आगमन ; शेतातील पिकांना जीवदान

प्रतिनिधी, जळगाव : चोपडा तालुक्यात प्रदीर्घ काळानंतर काल व आज पावसाने आगमन केलं आहे. गेल्या वीस ते पंचवीस दिवसा पूर्वी तालुक्यातील काही ठराविक भागात पावसाने जेमतेम हजेरी दिली होती. त्याने तालुक्यातील तग धरून होते परंतु काही भाग सोडला तर पूर्ण तालुक्यामध्ये पावसाने दांडी मारली होती. काल चोपडा तालुक्यातील सात मंडळापैकी तीन मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. तर इतर मंडळांमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला. महसूल विभागाने दिलेल्या पाण्याच्या सात मंडळाचे अपडेट नुसार चोपडा मंडळात 16 एमएम अडावद मंडळात, 97 एमएम धानोरा मंडळात, 99 एम एम, गोरगावले मंडळात 56 एमएम, चहार्डी मंडळात 21 एमएम , हातेड मंडळात 22 एमएम, तर लासुर मंडळात 20 एमएम पाऊस झाला. ज्या मंडळामध्ये चांगला पाऊस झाला त्या मंडळात शेतांमध्ये पाणी साठलेलं दिसत होतं तर काहीही पीक या पावसामुळे नुकसान देखील होताना दिसत होतं. आज परत दुपारी साडेचार पाच च्या दरम्यान आकाश भरून आलं आणि पावसाचे आगमन झालं दोन दिवसापासून चोपडा तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे समाधानकारक पाऊस जरी नसला तरी शेतकऱ्यांना समाधान मानावा लागणार आहे.