प्रतिनिधी, बुलडाणा : कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरोग शोध अभियान आणि राष्ट्रीय क्षयरोग शोध मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात 13 सप्टेंबर पासून कुष्ठरोग शोध अभियान राविण्यात येणार आहे, ही मोहीम 30 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार असून, या अभियानामध्ये जिल्ह्यातील 23 लाख 75 हजार 226 लोकांचे सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी 1836 सर्वेक्षण पथक कार्यान्वित करण्यात आली आहेत.
