जनतेज न्युज

विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटना आक्रमक

प्रतिनिधी, धुळे : धुळे जिल्ह्यातील अपंग बांधवांना मिळणाऱ्या हक्काच्या सवलती या शासनाकडून दिल्या जात नसल्यामुळे प्रहार क्रांती संघटना चांगलीच आक्रमण झाली आहे. दिव्यांग बांधवांच्या अनेक अडचणी आहेत. मात्र प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या शहर अध्यक्षा ॲड.कविता पवार यांनी केला. दिव्यांग बांधवांच्या अनेक अडचणी आहेत , शासनाच्या जीआर निघून देखील अपंग बांधवांना मिळणाऱ्या सवलती या मिळत नाही. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अपंगांना मिळणारा पाच टक्के निधी हा अजून पर्यंत दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचला नाही. तसेच नवीन जीआर नुसार पंधरावा वित्त आयोगानुसार १५ टक्के निधी खर्च करायचा आहे. मात्र तो देखील दिव्यांग बांधवांवर खर्च झाला नाही. तसेच या निधीबद्दल विचारणा केली तर दिव्यांग बांधवांना अनेक ग्रामपंचायतीकडून उडवा उडवीचे उत्तर दिले जात आहे. त्यामुळे धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तात्काळ धुळे तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची बैठक बोलवावी व त्यांना या संदर्भात योग्य मार्गदर्शन करावे व दिव्यांग बांधवांना त्यांचा निधी मिळावा व दिव्यांग बांधवांचा निधी त्यांच्यावर खर्च व्हावा. अशा सूचना कराव्यात अन्यथा येणाऱ्या काळात प्रहार क्रांती संघटना ही मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन केले असा देखील इशारा यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून अनेक वेळा आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाची दखल प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली नाही. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील दिव्यांग बांधव आजही न्यायच्या प्रतीक्षेत आहे. धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिवंग बांधवांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा तसेच दिव्यांग बांधवांच्या ज्या काही दहा ते बारा मागण्या आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी मागणी करत प्रहार अपंग क्रांती संघटनेने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.