प्रतिनिधी, मुंबई : आता पर्यंत मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार ही पावले उचलत आहे. त्या मधला हा भाग आहे. लोकशाहीमध्ये ज्या मतदानातुन जनता बोलते ती जनता उत्तर देईल. अनेक विषयांवर चर्चा झाली. एम.एम. आरडीचे कमिश्नर श्रीनिवासन यांना भेटण्यासाठी इथे आलो आहे. ट्राफिकमुळे नागरिकांचे हाल होतात त्यासंदर्भात भेट घेतली. तात्काळ हे खड्डे बुजवा हे सांगण्यासाठी आलो होतो. आम्ही मुंबईकर आहोत. त्यामुळे मुंबईकरांना सेवासुविधा देणं हे तिकडच्या प्रशासनाचे काम आहे. मग ते एम.एम आर डी असो. मुंबईकरांना होत असलेल्या त्रासातुन नागरिकांना मुक्त करावे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या वाहतुक कोंडीं आणि खड्डे या घटनेतुन नागरिकांना वाचवा.
