जनतेज न्युज

जमिनीच्या वादातून व्यावसायिकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

प्रतिनिधी, जालना : ताब्यात असलेल्या जमिनीवरील हक्क सोड,अन्यथा तुला जीवे मारू अशी धमकी संभाजीनगरमधील उद्योजक सचिन मुळे यांच्यासह 17 जणांनी जालन्यातील एका व्यावसायिकाला दिलीय.या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात सचिन मुळे यांच्यासह 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंकित अभयकुमार आबड असं मारहाण करण्यात आलेल्या जालन्यातील व्यावसायीकाचं नाव आहे.मारहाण करणाऱ्यांपैकी काही जण ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेत.जालना शहरातील सर्व्हे नंबर 554 मधील जमीन अंकित आबड यांच्या आजीच्या नावावर आहे.सध्या या जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे.मात्र अंकित यांच्या आजीने या जमिनीचे बक्षिसपत्र अंकित यांच्या नावावर केलेलं आहे.सध्या या जमिनीवर व्यावसायिक अंकित आबड यांचा ताबा आहे.या जमीनीवरील ताबा सोडण्यासाठी उद्योजक सचिन मुळे यांच्यासह 17 जणांनी अंकित आबड यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप अंकित यांनी केलाय.या प्रकरणी अंकित आबड यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.