जनतेज न्युज

सीआयआय विद्यार्थ्यांना देणार सुरक्षित ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देणार

प्रतिनिधी, औरंगाबाद : रस्ते अपघातात गंभीर जखमी, मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ‘टाटा’चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री, माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर तर हा विषय फारच गांभीयाने घेतला जात आहे. त्यामुळे आता देशभरात सुरक्षित ड्रायव्हिंग व सीटबेल्ट वापरासाठी शासन व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे.याचाच एक भाग म्हणून आता कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) या उद्योजकांच्या संघटनेनेही पुढाकार घेतला आहे. यावेळी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले की बीपीसी ड्राइविंग स्वतःला आणि इतरांना चालवताना स्वतःची व इतरांची कशी सुरक्षितता ठेवावी जेणेकरून रोड एक्सीडेंट होणार नाही व त्यांना होणारे नुकसान कसे कमी करता येईल यावर हा चांगला उपक्रम घेण्यात आलेला आहे यामध्ये सर्वच मान्यवरांनी चांगले मार्गदर्शन केले आहे तरी विद्यार्थ्यांनी गाडी चालवताना हेल्मेट वापरणे गरजेचे आहे फोर व्हीलर चालवताना सीडबेट वापरणे गरजेचे आहे असे निखिल गुप्ता म्हणाले आणि याची सुरुवात आज उद्यापासून करावी असे विद्यार्थ्यांना सांगितले.