प्रतिनिधी , जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची राज्यशासनावर जोरदार टीका केलि आहे . महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास कारणीभूत ठरणारा वेदांत प्रकल्प हा गुजरातकडे वळविण्यात आला असून हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. तसेच राज्यासाठी मोठी दुर्देवी बाब आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. या प्रकल्पामुळे राज्याची जी आर्थिक उलाढाल आहे, त्यात १८ टक्क्यांनी वाढ झाली असती, राज्याचा जीडीपी दर वाढला असता. प्रत्यक्ष उत्पन्न वाढल असत, लाखो तरुणांना यामुळे रोजगार मिळाला असता, मात्र हा प्रकल्प गुजरातकडे वळविल्याने या सर्वांपासून महाराष्ट्र वंचित राहणाार आहे. सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतांना हा प्रकल्प गुजरातकडे वळविला गेल्या यात मोठे राजकारण आहे, असेही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले. तसेच अजूनही वेळ गेलेली नाही, महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय असून यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट घ्यावी असेही खडसे म्हणाले. अजूनही वेळ गेलेली नाही, राज्यसरकारने प्रतिष्ठा पणाला लावून हा प्रकल्प पुन्हा राज्याकडे आणावा असेही खडसे म्हणाले. मात्र २०१४ निवडणुकीच्या शिवसेनेच्या त्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. मुक्ताईनगरचे असो की , जिल्ह्यातील इतर रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत, अशी अपेक्षाही एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे व्यक्त केली. गैरसमजातून साधूंना मारहाण झाली, म्हणजे या राज्यात साधु सुध्दा सुरक्षित नाही, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे. या घटनेत सुदैवाने अनर्थ टळला अन्यथा पालघरच्या घटनेची पूनरावृती झाली असती, असेही खडसे म्हणाले.
