जनतेज न्युज

लंपी आजाराच्या संदर्भात राज्यसरकारने ठोस निर्णय घ्यावा; विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची चिकलठाणा विमानतळावर प्रतिक्रिया

प्रतिनिधी , औरंगाबाद : विरोधी पक्षनेते अजित दादा पवार हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असता माध्यमाने विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार म्हणाले की महाराष्ट्र मध्ये जनावरांमध्ये लंपी आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असून या संदर्भात जनावरांचे लसीकरण करणे गरजेचे असून यासंदर्भात लस निर्माण करून जनावरांना देण्यात यावी यदाकदाचित लस विदेशातून मागवावी लागेल असेल तर शासनाने यासाठी उपाययोजना कराव्या नाहीतर महाराष्ट्रातील दुधाचा मोठा व्यवहासे संपुष्टात येऊन जाईल,
शेतकऱ्यांना या आजारा संदर्भात परिपूर्ण माहिती देण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याची गरज असून याचा संसर्ग महाराष्ट्रातील जनावरांना सुद्धा होत आहे देशांमध्ये हजार मोठ्या प्रमाणात जाणारा मधून होत असल्याचे माध्यमाच्या माध्यमातून कळत असून आता आता ही समस्या मुख्यमंत्र्यांनी सोडवावी यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याची गरज असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी आज रोजी माध्यमांशी बोलताना दिली आहे.