प्रतिनिधी, अमरावती : आज अमरावतीत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रहार मध्ये प्रवेश केला. या मेळाव्याला संबोधित करताना बच्चू कडू यांनी प्रहारचे १० आमदार असते तर परिस्थिती बदलली असती, येणारा मुख्यमंत्री प्रहारचा असता अस मोठ वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं,येणाऱ्या निवडणुकीत १५ उमेदवार उभे करू आणि १० निवडून आणू व प्रहारचा मुख्यमंत्री करू अस देखील वक्तव्य त्यांनी केलं.प्रहार सत्तेजवळ जाणार नाही पण आमच्या शिवाय सत्ता बसणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होईल. आम्ही राजकारणी आहोत राजकारण करावे लागतं. उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांची काय अवस्था झाली आहे. असं वक्तव्य देखील बच्चू कडू यांनी केलं.
