जनतेज न्युज

अमरावतीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य अधिवेशन; अमरावती शहरात भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन

प्रतिनिधी, उसमानाबाद : अमरावती शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 24 वे राज्य अधिवेशन आजपासून होत आहे, तीन दिवस चालणाऱ्या या राज्य अधिवेशनात राज्यभरातील लालबावट्याचे कार्यकर्ते व पदाधिकारी अमरावतीत दाखल झाले आहे. तत्पूर्वी आज अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आल,गेल्या 27 वर्षांपूर्वी अमरावती शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच अधिवेशन झालं होतं, तर तब्बल 27 वर्षानंतर हे अधिवेशन पुन्हा अमरावतीत होत असल्याने अमरावती जिल्ह्यातील भाकप पक्षाच्या कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला.