जनतेज न्युज

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनींना अन्नातून विषबाधा ; जलधारा आश्रम शाळेतील प्रकार

प्रतिनिधी, नांदेड : नांदेड मध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनींना अन्नातून विषबाधा झालीय. किनवट तालुक्यातील जलधारा येथील आश्रम शाळेत हा प्रकार आज दुपारी घडला. दुपारच्या जेवणानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळणे, उलट्या झाल्याने 11 विद्यार्थांना तातडीने हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या पैकी पाच विद्यार्थांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती हिमायतनगरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. विद्यार्थींनीनी वांग्याची भाजी खाल्याने मळमळ, उलट्या झाल्या, चक्कर येत होते अशी माहिती दिली.