जनतेज न्युज

डोंबिवलीच्या रस्त्यांसदर्भात ठाकरे गटाचा शिंदे गटाला पाठिंबा

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : दोन दिवसांपूर्वी एका खाजगी शाळेच्या कार्यक्रमात आमदारांनी रस्त्यांसदर्भात बोलताना अप्रत्यक्षरीत्या उद्धव ठाकरे व मुख्यमंत्र्यांना टोला लगावला होता. त्यानंतर डोंबिवली शहरात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडायला सुरुवात झाली आहे. मात्र ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क शिंदे गटाचे समर्थन करत डोंबिवली शहर बकाल करणे हे गेल्या 15 वर्षांपासून आमदार असणाऱ्या रवींद्र चव्हाण हेच जबाबदार आहे, असा थेट आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिंदे गटाचे माजी नागरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना लक्ष करत तेरा वर्षात त्यांनी डोंबिवलीमध्ये जे पाप केले आपली पाप झाकण्यासाठी दुसऱ्यावरती आरोप प्रत्यारोप करणं बंद करा तुम्ही आमदार असताना नेमके काय केले असा प्रश्न विचारत चव्हाणांवर पलटवार केला होता. नेमक्या याच प्रश्नांची रीघ ओढत ठाकरे गटाचे पदाधिकारी सदानंद थरवळ यांनी देखील करत आज कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 15 वर्षात नेमके काय केले असा थेट आरोप केला. रस्त्यांची दुर्दशा झाली असून नागरिक हैराण झाले आहेत. आता रस्त्यांसदर्भात आरोप करणारे चव्हाण गुवाहाटीला मुख्यमंत्र्यांसोबतच होते मग तेव्हा का नाही यासंदर्भात चर्चा केली, असा प्रश्न देखील थरवळ यांनी उपस्थित केला आहे. मात्र शिंदे गटाच्या आरोपानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनीही भाजप सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना टार्गेट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.