जनतेज न्युज

शेतकर्यां च्या आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला डाग – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

प्रतिनिधी, यवतमाळ : शेतकर्यांोच्या खात्यात पाच दिवसात मदत निधी टाकू ही राज्य सरकारची घोषणा फोल ठरली आहे. सरकारच्या दुर्लक्षित धोरणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. त्यातही यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहे. शेतकरी आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला डाग आहे, असे टिकास्त्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोडले. शेतकरी आत्महत्येमागे प्रशासनासह राज्य सरकारचे धोरण जबाबदार आहे. शासनाच्या योजना शेतकर्यांडपर्यंत पोहचत नाही, असा आरोप दानवे यांनी केला. सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात होत असल्याने कुटुंबियांच्या भेटी घेवून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणीदेखील करणार आहे.