प्रतिनिधी, औरंगाबाद : सध्या पृथ्वीवर जगातील 52 टक्के शेत जमीन अधिक निकृष्ट झाली आहे जर असेच चालू राहिले तर शेतकऱ्यांना शेती व अन्नधान्य पिकविणे कठीण होईल याकरिता माती वाचवा अभियान सुरू आहे.माती वाचवा अभियानांतर्गत जनजागृती करत आहोत क्रांती चौक पासून पैठण गेट निराला बाजार सावरकर चौक मार्गे क्रांती चौकात ही पदयात्रा काढण्यात आली आपली माती ज्याच्यामध्ये ऑर्गनिक कंटेंट वैज्ञानिक दृष्ट्या मृदा ते कमी होत चाललेले आणि त्या मातीला माती म्हणण्यासाठी तीन टक्के ऑर्गनाईक कन्टेन्ट मृदा असली पाहिजे जर ही मृदा जर काढून टाकली तर मातीचा कणाचं रुपांतर वाळुत होते ती माती राहत नाही रेती होते ही समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि वैज्ञानिकांनी केलेल्या सर्व सर्वेक्षणानुसार प्रत्येक सेकंदाला एक एकर मातीचे वाळवंटीकरण होत चाललेला आहे ही फार मोठी समस्या आहे त्यामुळे अन्नधान्य पिकवण्याची समस्या निर्माण होऊ शकते त्याकरिता आपण सर्वांनी माती वाचवण्यासाठी सहभाग घ्यावा जनजागृती पसरण्यासाठी आणि मातेच्या पुनर्जीवनासाठी सरकारी धोरण निर्माण होण्यासाठी सद्गुरुंनी एकट्या मोटरसायकल वरून 100 दिवसांत जमवला तीन हजार किमी चा प्रवास केलेला आहे. सध्या निसर्गाचे संवर्धन करण्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे माती जर आपण मातीचे नुकसान थांबू शकलो नाही तर हा ग्रह मनुष्यांसाठी जगण्यास पोषक राहणार नाही असे सद्गुरूंनी सांगितले आहे जगातील 52 टक्के जमीन अधिक निकृष्ट झाली आहे जगातील माती येत्या केवळ साठ वर्षासाठीचे पिकाचे पोषण करू शकेल मातीला जिवंत ठेवायचे असेल तर मातीला पिकांचे पोषण करण्यासाठी सेंद्रिय घटकांची गरज आहे सेंद्रिय घटक माती पाचोळा आणि प्राण्यांची विष्ठा मातीत मिसळली गेली पाहिजे मातीतील सुक्ष्म जीवन सेंद्रिय घटकावर पोषित होतात वनस्पती साठी पोषण तत्वे निर्माण करतात स्वतः आणि पोषक अन्न कमीत कमी वातावरणात बदल अधिक जैविक विविधता दारिद्र्य दूर करण्यात मदत होते वनस्पती आणि प्राणी वाढतात आणि फुलतात माती समृद्ध होते याकरिता आपण प्रयत्न करायला हवे असे विद्यार्थी म्हणाले.
